STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Children Stories Action Inspirational

3  

Bhagyashri Chavan Patil

Children Stories Action Inspirational

शिव शंभाजी

शिव शंभाजी

1 min
115

शिवपुत्र संभाजी राजे म्हटलं की 

तुमचाच चेहरा समोर येतो..


तुमच्या सारखा मावळा पाहिला की

अंगावर काटा उभा राहतो..


खरंच मागच्या जन्मी जणू तुम्हीच

राजच रूप असाल असा विश्वास वाटतो..


तुमच्या सारखा अस्खलित कलावंत

पहिला की उर अभिमानाने भरून येतो..


तुमची व्यक्तिरेखा साकारत सह कलाकार 

ही जिवाचं रान करताना दिसतो..


अवघ्या काहीं तासांचा कार्यक्रम मनात

जसाच्या तसा घर करून राहतो..


थरारून टाकणारे दृष काही काळासाठी

अगदी शांत करून जातो..


घोड्याच्या टापांचा आवाज ऐकताच ओठी

एकच नावाचा जय जयकार होतो..


तुमच्या मनातले ध्येय निश्चितच पूर्ण होणार

याची श्रींकडे प्रार्थना करतो..


लहान मुलांच्या मध्ये आज ही शंभू बाळाचा

हसतानाचा चेहरा आपोआप समोर उभा राहतो..


काय कीर्ती असेल माझ्या राजाची की त्यांनी

या जन्मी आबा साहेबांचा शुर छावा दिसतो


तुमचं हे स्वप्न जगताना पाहून लहान लेकरू

सुद्धा तुम्हाला भेटलं की नतमस्तक होतो..


Rate this content
Log in