राग ऋतु
राग ऋतु
हो रागवली आहे
स्वतःवर भवतेक का ते माहीत नाही
पण दुखावली जरूर आहे..
हो रागावली आहे
तु असं मी होण्याचा सारखा केविलवाणा
प्रयत्न करते आहे..
हो रागावली आहे
तुझं असणं महत्त्वाचं म्हणत तु माझाच
कसा हे जगाला पटवून देत आहे..
हो रागावली आहे
डोळस स्वप्नांमध्ये तुझ असणं कुठे तरी
अपेक्षा ठेवू लागत आहे..
हो रागावली आहे
तु नाही मनवल तरी चालणार आहे
हक्काचं माणूस तू आहे का माहीतच नाही आहे..
>
हो रागावली आहे
दर वेळी काय तरी बोलून करून
परत परत तुला उगाच त्रास देत आहे..
हो रागावली आहे
तुला मी स्वतः मध्ये इतकं गुंतवल आहे
की स्वतःचे भानच उरले नाही आहे..
हो रागावली आहे
काही बोलायचं नाही अस माझं मीच
ठरवल आहे त्याने तरी शक्य होतं का पहायचं आहे..
हो रागावली आहे
तु स्वतःहून नाही येणार हे अगदी पक्क समजलं आहे त्यामुळे तुझी सुटका झाली याच समजाधन आहे..
हो रागावली आहे
या पुढचा काळ कठीण असणार आहे
म्हणूनच इथे पूर्णविराम द्यावा असे वाटते आहे..