फोपावलेत दुसऱ्याच्या जीवावर.
फोपावलेत दुसऱ्याच्या जीवावर.
माझा कित्येक कविता चोरीला गेलेत.
चोरी करणाऱ्यांची मन मेलेत.
वाऱ्याने पडणारा चाफा.
मोगऱ्याचा सुगंधी गुंफा.
चोरांना नाही समजली माझी व्येत्ता.
शुंगाराने नटलेली कविता रंडकी झाली आता.
शब्दांना जिवंत संगीत देणारा.
खरा खलनायक म्हणजे कवी..
अंत पाहू नका त्याचा कधी.
अरे मेंदूला वेडा बनून,
जोकून देतो स्वतःला आगीच्या भाटीत.
कधी गोटल्याल, असत रक्त रात्रीच्या थंडीत.
शब्दाच्या कोड्यात डुबतो,
कवितेच्या शीर्षकाला आपला जीवन साथी समजतो
आणि लिहितो नसान मधी भरलेल अवक्य.
सोपं आहे कवी बनण?
की कविता चोरन?
कवितेत त्याच्या शब्द भावना असतात,
शब्दांशी अनोखी जोडलेली नाती असतात.
हारून जात नाही कोणता ही कवी.
पण रडत असतो क्षणो, क्षणी.
हिथे रोज बाजार भरतो बैलांचा.
दिसतो भाव वाढलेला गाढवांचा
नाती जपतात समूहाचे, कार्यकर्ते.
वाचण्याआधी कविता त्यांना समजते
तुमच्या सन्मानाचा गुलाम नाही कवी.
विसरून नका?
कवी अंधाराला मिटवणारा तेजस्वी रवी.
मनात खेळणारे शब्द..
पानावर उतरून केले त्यांना बंद.
मग रंगवले, थोडे सजवले.
घडवले मोकाट रान हे हिरवे,पाहून मनमोगरा डोले.
जिवंत भासवते,बिना मातीची,
बिना पानण्याची, काव्यशेती.
