STORYMIRROR

Vasudha Naik

Crime

3  

Vasudha Naik

Crime

होळी

होळी

1 min
265

लाल, पिवळा, निळा रंग

सारे ताटात छान सजले 

आईच्या हाती ताट पाहिले

ओवाळायला पाटावर सारे बसले...


बाबा, आजोबांना लावला

आईने भाळी रंगीत टिळा

बाबांनी आपल्या हातात घेतला 

रंग छानदार आकाशी निळा....


बाबांनी लावला आईला रंग

आजोबांनी लावला आजीला रंग

बालचमू विखुरली धुळवडीत 

झाली ती रंग खेळण्यात दंग.....


खेळून खेळून सारी दमली

आपापल्या घरी निघाली

घरी जावून आंघोळ केली

रंगांची मजा सर्वांनीच लुटली....


रंग होते निसर्गातील फुलांचे

नाही त्रास झाला याने कोणाला 

कृत्रिम रंग नकोतच बाबा रे

नैसर्गिक रंगामुळे मजा आली खेळाला....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Crime