बलात्कार
बलात्कार
तारुण्याच्या उंबऱ्यावर
पोरी जरा जपून...
वखवखलेल्या नजरा
बसल्यात इथं टपून..
वासनांध नराधमांच
काळीज गेलंय मरून..
कोवळी असो वा वयस्क
जातात लचके तोडून..
नको विश्वास ठेवू
परकीयांच्या थापांवर..
विश्वास उरला नाही
इथं जन्मदात्या बापावर...
नजरेने तर इथं
रोजच होतो बलात्कार...
गर्दीचा फायदा घेत
होतो स्पर्शसुखाचा वार...
नवऱ्याने केलेला बलात्कार
याची कुठे वाछता नाही...
अधिकाराच्या नावावर
बलात्कार होत नाही...?
*ह्यातून कोणाच्या भावना दुखवण्यातचा हेतू नाही... प्रसारमाध्यमातून आपण रोज बलात्काराच्या घटना ऐकतो ...त्यावरून लिहिली आहे
