चूक
चूक
चांगल्या गोष्टीच कौतुक
जमलं नाही कोणाला.
झाली चूक एकदा ती
दिसली साऱ्या जगाला.
आयुष्यभराची आता
खंत होती मनाला.
रात्रंदिवस रडलो
आसवं होती उशाला.
वरवरच्या मुलाम्याची
गरज नाही व्रणाला
जखम झाली नव्हती
फक्त माझ्या तनाला
अपमानाच वागणं
आलं आहे नशिबाला
लाचारीच जगणं
अर्थ नाही जगण्याला.
विश्वास नाही राहिला
स्पष्टीकरण कशाला
गैरसमजाने लागला
सुरंग आपल्या नात्याला.
