राजे
राजे
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न
होते जिजाऊंच्या उरी
श्रींची इच्छा मानून
स्वप्नपूर्ती केली खरी.
खेळण्या बागडण्याच्या वयात
घेतली शपथ रायरेश्वरी
स्व रक्ताचा अभिषेक
घातला शिवपिंडी वरी.
सवंगडी सारे झाले
शिवबाचे मावळे
स्वराज्यासाठी हाती
तलवारी घेऊन धावले.
गनिमिकाव्याने सारे
राजकारण केले
एक एक किल्ले करत
स्वराज्यात सामील केले.
जिजाऊंचा शिवबा
राज्याभिषेकाने न्हाले
रयतेचा जाणता राजा
शिवछत्रपती राजे झाले.
