आजचा समाज...
आजचा समाज...
दिवसेंदवस समाजात एवढा
बदल घडत चालला,
कशी झाली माणसाची वृत्ती
की तो पूर्वी सारखा मुळीच नाही राहिला...
माणसा,तू घेतलेले हे भक्षक रूप
देतात तुझी ग्वाही,
किती फरक पडला तुझ्यात आता
तू, माणुसकीचा धर्मच पाळत नाही
भागवण्या आपल्या भुकेची ती इच्छा,
घेतो आहे मुक्या जनावरांचे प्राण,
काय भरल तुझ्या डोक्यात आता
की राहिली नाही तुला मुक्या जीवाची ही जाण...
आणि काय हा राक्षसी पणा भरला अंगात,
कुठे फेडशिल माणसा ही पापे,
आज एक शब्द ही न बोलता
भर रस्त्यात तीला जाळलं जाते...
सोड रे माणसा घेतलेले हे भयानक रूप,
आणि काढून टाक हे क्रूर विचार
पाळून माणुसकीचा तो धर्म
मग होईल नाही ती माऊली कधीच अबला आणि लाचार...
मानून तिला आपली माय बहीण
कर रे माणसा तिचा सन्मान,
ना घडतील मग अश्या घटना
ना होईल समाजात माणुसकीचा अपमान...
म्हणून विसरून तुझ्यातले ते अवगुण सारे,
धर, तो आता सत्येचा मार्ग
आणि वागून सर्वांशी माणुसकीने तू,
मग नक्कीच बनेल हा समाज ही स्वर्ग,
बनेल हा समाज ही स्वर्ग...
