आई
आई
प्रत्येकाच्या जीवनात असते
ज्या स्त्रीचं मोठं योगदान,
म्हणून प्रत्येकाने करावा त्या आईचा नेहमी सन्मान...
म्हणूनच म्हणते...
आई तुझे किती मानू मी उपकार
ते देखील कमी आहे,
मी लाख चुका करूनही तू मला कौतुकाने पाहे...
कारण या बाळासाठी झिझवली गं तू तुझी ही काया,
परंतु कधीच कमी पडली नाही तुझी या बाळा वरील माया...
आणि त्रास सर्व सहून तू आम्हाला फोडवानी जपलं,
दुःख सर्व स्वतः च्या मनात दाबून आपलं...
तसेच आई तुझ्यासारख नाही कुणी या जगात,
आणि माझे नशीब थोर की
तु मिळाली माझ्या भाग्यात...
आई तुला काय सांगू तुझी किर्ती आहे ग खूप महान,
तुझ्यासाठी कितीही शब्द लिहले असता ते पडतात ग खूप लहान..
तिन्ही लोकांहून आहे सर्वात श्रेष्ठ गं तू आई,
आणि उपकार तुझे खूप आम्हावर ते कोणत्याही जन्मी फिटायचे नाही...
