लांडगे
लांडगे
मुलींचे लचके तोडण्यास टपलेत समाजात कांही लांडगे
त्यांना तळलं पाहिजे जसे तळतात वांगे
त्यांची झालीया वाईट प्रवृत्ती
कधी बदलेल ही वृत्ती
'निर्भया' सारखे वाढत आहे प्रकरण
न्यायालय ही देत नाही लवकर त्यांना सरण
वाट पहात आहे मरण
मोकळं झालं आहेे अशा लांडग्यांना रान
झालेत ते वासनेने बेभान
उरले नाही त्यांना कशाचेही भान
कार्य करत आहेत असे घाण
आपणच ठेचली पाहिजेे त्यांची मान
अशा लांडग्यांची झाली मनमानी
हिंगणघाटच्या जळीतेनी दिली आपली कुर्बानी
म्हणून द्या आपल्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे
तेंव्हा अशा लांडग्यांची निघतील मडे
शिकवा आपल्या मुलींना कराटे, बॉक्सिंग आणि कुस्ती
जिरेल बरोबर अशा लांडग्यांची मस्ती
माता कमी पडल्या देण्यात लांडग्यांना संस्कार
समजवण्यात जीवनाचा सार
म्हणून घडवत आहेत ते हाहाकार
