पीडित
पीडित
मेणबत्ती हाती घेऊन मोठी प्रभात फेरी काढली
घोषवाक्यांनी सगळीच रस्ते दणाणली
त्या पीडित मुलीच्या घरच्यांची खंत ही वाटली
म्हणून नराधमांच्या शिक्षेसाठी सरकारकडे मोर्ची वळवली
मिडीया वर्तमानपत्राकडे ही मदतीची अपेक्षा केली
आपल्या वासरावर झालेल्या जीवघेण्या अत्याचारामुळे एका आईचे आक्रोश पाहून सगळेच हळहळली
वाईट झाल्यानंतर सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली
तरी माणसं म्हणून घेणाऱ्या काही माणसांना कसलीच सोयरसुतक नव्हती
विकृत लोकांच्या वासनेचे पोट कुठे भरणारी होती
शिक्षेच्या आधीच पुन्हा नव्याने दुसऱ्या एखाद्या लाचार मुलीवर अत्याचारे झाली
पुन्हा पीडित , अत्याचारी ती मुलगी अशी कानी बातमी आली
पाषाणालाही पाझर फुटेले पण ते नराधम नाही सुधारली
पुन्हा पुन्हा ही अशीच कृत्ये घडत गेली
याच विकृतानमुळे एक मुलगी अजूनही आई बापाच्या चिंतेचे कारण बनली
