STORYMIRROR

नेहा संखे

Tragedy Fantasy

3  

नेहा संखे

Tragedy Fantasy

मी कुणाला कळलेच नाही

मी कुणाला कळलेच नाही

1 min
177

सखा कोण आणि सोबती कोण   

हे भेद साधे कळले नाही !  


सगळ्यांचे मन जपत राहिले   

पण माझे मन विचारात कोणी घेतले नाही !  


प्रत्येकासाठी झुरत राहिले मात्र  

 माझ्या पंखांना बळ कोणी दिले नाही ! 

 

कोणी नाही असा सोबती आला  

ज्यांनी मला छळले नाही !  


केला सामना सगळ्या सुखदुःखांशी   

त्यांना पाहून डगमगले नाही !   


कठीण काळात साथ आपल्या माणसांची   

मी कधीच सोडली नाही !  


जीवनात आले खूप दु:खाचे डोंगर   

त्यांना पाहून घाबरले नाही !  


सुखाचा आस्वाद घेताना ही   

मी कधीच अहंकार केला नाही !  


 सत्याला कधी घाबरले नाही   

खोट्यात कधीच मिसळले नाही !  


एवढे करूनही कमीच पडले   

म्हणूनच मी कुणाला कळलेच नाही !  

मी कुणाला कळलेच नाही !!  

  

  

  

  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy