कातरवेळी
कातरवेळी
तूझी आणि माझी भेट ती कातरवेळीची
आठवते का तुझं ती शांत समुद्रालगतची
एकमेकांच्या नजरेत नजर पार बुडालेली
हातात हात माझे तू घट्ट पकडूनी
झाली होती प्रेमाची सुरुवात त्या कातरवेळी
शरमेने लाल झालेली
शब्दांनीही साथ सोडलेली
काळजाचे धडधड वाढलेली
मावळणार्या सूर्याच्या साक्षीने
तू आणि मी स्वीकारलेले बंद प्रितीचे
झाली होती प्रेमाची सुरुवात त्या घातली होती
समुद्र शांत पण आपल्या मनात होत्या भावनेच्या लाटा उफाळत
अबोल जरी असले आपण तरी मनात होते भावनांचे वादळ
आज तर तुला पाहण्याचीही भीती वाटे
नजरेला नजर भिडताच हृदयाचाही ठोकाही चुके
झाली होती प्रेमाची सुरुवात त्या कातरवेळी
तू नसती जरी सतत आता अवतीभोवती
तरीही विसरलो नाही मी अजूनही
भेट तुझी नि माझी ती कातरवेळी
झाली होती प्रेमाची सुरुवात त्या कातरवेळी

