कवितेवर कविता
कवितेवर कविता
इकडून मात्रे घेतले, तिकडून काने लावले,
आगळ्या वेगळ्या शब्दांना घेऊन मी माझ्या कवितेत उतरवले
काही शब्दांचे अर्थ कळले काही शब्दांचे अर्थ मीच माझ्या मनाने बदलले
कधी यमक आपोआप जळून आले तर , कधी कधी ओढून ताणून जुळवले
कधी कधी आपसूकच गालावर हसू उमटले,
कधी कधी काय लिहते मी ? हे असं म्हणत स्वत: च कपाळाला हात मारले,
कुणाच्या मनाला माझे शब्द आघात करून गेले,
तर कुणाला सुखावूनही गेले,
माझ्याच कवितांमध्ये मी पार गुंतूनिया गेले,
अशा तऱ्हेने मी माझ्या कविताना कागदावर उतरवले
कधी सोयीनुसार अक्षरं वापरले
तर कधी सोयीनुसार बदलले,
माझ्या रचनानी कधी मला हसवले,तरकधी माझे मलाच रडवले,
कधी कधी ते शब्द माझी साथ देतात असे भासले,
तर कधी तेच माझ्यावर हसतात असं ही जाणवले,
याच शब्दांनी माझ्या कवी मनाला जागे केले,
मनात चाललेल्या भावनांची शब्दरुपी सांगड तयार केले.
