मी माझीच नाही उरले
मी माझीच नाही उरले
मी माझीच नाही उरले
मी माझीच नाही उरले
अहो खरंच मी माझीच नाही उरले
आनंदातही लिहिते दु:खातही रचना सुचते
आसावांमध्येही काव्याची सुरुवात होते
कधी कधी तर विचारात धुंद होऊन जाते
वाचता वाचता ही माझ्याच दुनियेत मग्न होऊन जाते
बोलता बोलता ही गप्प होऊन जाते
कधीतरी असंही होते गालातच खुदकन हसते
भावना माझ्या मनातले कोऱ्या कागदावर उतरवते
कल्पनेच्या दुनियेत हरवतानाही वास्तवाचीही क्षणोक्षणी दर्शन होते
आणि मग माझी लेखणी माझी सहचरणी होऊन काम करते
मग तीही माझीच होऊनी जाते
आनंद दुःखात नेहमीच असते माझ्या सगतीस
लेखणी हातात येताच माझी मी कुठे राहते
असं म्हणतात प्रेमात काहीच सुचत नाही
तसेच बहुदा मी हल्ली अनुभवते ही
हवीशी वाटते हल्ली शांतता फक्त
माझ्यात विचारात वाटतं गुंतून राहावंसं
खरंच की काय प्रेमात पडल्यासारखं वाटतं
गैरसमज नका हा करू
माझ्या कवितांचा प्रेमात पडावं असं वाटतं
मी माझीच नाही उरले
अहो खरंच मी माझीच नाव उरले
