अरे अरे माणसा
अरे अरे माणसा
अरे अरे माणसा काय खेळ
करतोस रे तू हा असला,
सोन्या सारख्या लेकरांना
लळा लावतोस रे हा कसला
आजच्या या क्षणभर सुखासाठी
नको घालूस वाद,
अन करु नकोस उद्याची पिढी
ही अशी बरबाद
जीव यांचा इवलासा हा
खेळण्या बागडण्याचा,
मोबाईल देवूनी हाती
खेळ बिघडवतोस जीवनाचा
कर विचार हा थोडातरी
या नाजूक जीवांचा,
नकोस बनवू यांना
धनी त्या पापांचा
अरे अरे माणसा
काय करतोस रे तू हे असे,
तुझ्या क्षणभर सुखासाठी
यांना दुःख देतोस रे कसे
