26 नोव्हेंबर चा ताज
26 नोव्हेंबर चा ताज
26 नोव्हेंबर ची ती काळी रात्र
रक्ताचा पाट वाहणारी
किंचाळीच्या ठिणग्या उडवणारी
झाकून गेली मुंबई ची शान
अन लिहून गेले ते
दहा अतिरेकी
मुंबई च्या छाताडावर
एक सैतानी सत्यकथा
पण या अतिरेक्यांना काय कळणार
हुतात्मा म्हणजे काय ते
ते वीरमरण मिळालं
कामठे करकरे साळसकर शिंदे यांना
ताज ही हळहळला असेल
संदीप अन गजेंद्र ची देशभक्ती पाहून
ओबेरॉय ही कधी विसरू शकणार नाही
ती काळी रात्र
देतंच राहील ग्वाही नरिमन हाऊस ही
या अतिरेकी हमल्याची
पण तुमच्या आमच्या मनावर जे
ओरखडे काढले या सैतानांनी
त्याचं काय ?
तीनही सेनेनं कर्तव्यच मानलं
स्वतःच्या देशभक्तीला
पण आपण विसरलो तर नाही ना त्यांना ?
जागावं लागेल
जर विसर पडत असेल तर
कारण खरे हिरो
या तीन सेनाच आहेत
आपण सुरक्षित जगतोय
हे उपकारच आहेत त्यांचे
खरंच आभार त्या पोलिसांचे आणि
अग्निशमन दलाचे
ज्यांनी जीवाची पर्वा न करता
बजावले आपले कर्तव्य
ज्यांनी सी एस टी स्टेशन चा मुकुट
पडू दिला नाही
म्हणून सुरक्षित आहोत आज आपण
पण पुन्हा पुन्हा मनाला चटका देऊन जाते
ती एकच गोष्ट
पुन्हा पुन्हा विचाराविशी वाटते
ती एकच गोष्ट
का ? काय मिळालं त्यांना असे
रक्ताचे पाट वाहून
पण कदाचित याचं उत्तर
त्यांच्याकडेही नसेल
कारण माणसाचा सैतान झाला
की असाच वागतो
मग तो कुठे
माणुसकी बघतो
