STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy Crime Others

3  

Pandit Warade

Tragedy Crime Others

जळती स्वप्ने

जळती स्वप्ने

1 min
202

पाऊल टाकतांना 

हळुवार मंडपात

सुखी संसाराची 

स्वप्ने उरात होती


रंगते करात मेंदी 

स्वप्ने तशी रंगावी

घरकुल ते सजावे 

ठरवत मनात होती


येता नव्या घरात

कौतुक होत जाई

खुलते कळी मनाची

प्रीती मनात होती


दिवस नऊ नव्याचे

सरले कसे न कळले

कळता क्षणीच भरली

धडकी ऊरात होती


मानव्याच्या पडद्याआड

दडले पशुत्व होते

स्वप्नासाहित नववधू

उभीच जळत होती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy