STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy Crime Thriller

3  

Rohit Khamkar

Tragedy Crime Thriller

म्रुत्यु धर्म

म्रुत्यु धर्म

1 min
876

बाजार मांडलाय सारा, त्यात फक्त पैशाला किंमत

फाटका खिसा घेऊन जगण्याची, कुणा नाही हिंमत


मग चालू झाला खेळ, सारी काय फसवा फसवी

भेसळ करूनी आम्ही कमावतो, तरी वाटणी पाई रुसवा रुसवी


कित्येक माना मोडल्या आम्ही, पोट स्वतःच भरण्यासाठी

आधार शेवटी घ्यावा लागेल, चालताना सोबत साठीची काठी


बरं एवढं कमवलं तरी, भूक आमची भागत नाही

म्रुत्यु सोहळा होईल मोठा, बाकी कश्याला अर्थ नाही


मग उठ्तिल हजारोंच्या पंगती, खर्च होईल लाखांचा

जिवंतपनी पैसे खाल्ले ज्यांचे, मेल्यावरी जल्लोश त्यांच्या भुकेचा


नाही केले दान धर्म, की जपली नाही नाती

त्याच स्मशानाच्या राखेने, भरतात साऱ्याचिं पो

आयुष्यभर ज्यांना कधी, करता आले नाही चांगले कर्म

मरणाच्या दारात ऊभा, तेव्हा आठवतो मग धर्म


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy