!! पत्रकारिता!!
!! पत्रकारिता!!
विकल्या जाते पत्रकारिता पैशाच्या जोरावर,
दाबला जातो खरा आवाज सत्तेच्या बळावर.
स्त्रीवर होत आहे पापी अत्याचार,
युवतीवर घडत आहे कसा हा बलात्कार.
जगाचा पोशिंदा आज उपाशीच मरतो,
देशाचे भविष्य नेत्या मागे फिरतो.
खनक नाही वाजत होणाऱ्या अन्यायावर,
विकल्या जाते पत्रकारिता पैशाच्या जोरावर.
उपोषणाला बसले अन्याय सहन करणारे,
रस्त्यावर उतरले स्वतःचे हक्क मागणारे.
नाही जाण यांना होणाऱ्या अपहरणाची,
कधी होईल आठवण वाढत्या आतंकवादाची.
देशद्रोह्यांना नेत्याच्या जागी ठेवणे कसले हे लक्ष,
बलात्काऱ्यांना संसदेत पाठवितात कसले हे पक्ष.
नाही आवाज आदळला लोकशाहीच्या कानावर,
दाबला जातो खरा आवाज सत्तेच्या बळावर.
होणाऱ्या भ्रष्टाचाराला आवाज नाही फुटत,
सत्य समोर येता समर्थकांची झोप नाही उठत.
नाही ज्याच्या घरात पाणी दारू पितो सत्ताधीशांची,
अब्रू लुटतो नैतिकतेच्या न्याय रूपी मूर्तीची.
खोट्या बातमीला सत्याचा थर लावण्यास प्रवृत्त कसा झाला,
तुझ्या याच कृतीने मनुष्य अराजकवादी बनला.
किती दिवस जगशील तू नेत्याच्या भरोशावर,
विकल्या जाते पत्रकारिता पैशाच्या जोरावर.
कुठे जळते लेकं दुसऱ्याची वंशाच्या भ्रमावर,
भविष्य अंधारात दिसते व्यसनाचा शिरावर.
विटंबना होते महापुरुषाची दिसते का पानावर,
स्वातंत्र्याचे विरही लढतात जातीच्या छतावर.
अपघाताचे मृतशरीर झाकल्या जात आहे रस्त्यावर,
दाबला जातो खरा आवाज सत्तेच्या बळावर.
अपमान देशाचा करतो धर्माच्या अभिमानात,
धर्माचे होऊनी धर्माचं न ऐकतो सत्तेच्या आचरणात.
बाजार मांडला होता गरजेचा, बाजार वाद केला वस्तूचा.
नियम बदलला जगण्याचा अर्थाच्या मिथ्यावर,
विकल्या जाते पत्रकारिता पैशाच्या जोरावर.
कालावधी सत्तेचा विश्वास शास्वत करतो,
नश्वर शरीराला अमरत्व देण्याचे प्रयत्न करतो.
जाहिरात होते निष्क्रिय कर्माच्या फळाची,
भ्रमित रूपी कागदावर.
विकल्या जाते पत्रकारिता पैशाच्या जोरावर,
दाबला जातो खरा आवाज सत्तेच्या बळावर.
