कोरड्याबरोबर ओलेही जळतं
कोरड्याबरोबर ओलेही जळतं
असं म्हणतात कोरड्याबरोबर
ओलेही जळतं.
काय चूक त्या ओलाव्याची,
जे कोरड्यासोबत येतं.
चुकून पदरी आलेलं ते जळणं,
ते ओलाव्यातच कळतं.
नशिबी नसलेलं सोबतीच कोरडेपण,
आयुष्यभर सलतं.
