जीवन मलाही
जीवन मलाही
आई गर्भात मला
मारू नको ग
जीवनात मलाही
तरु देणा ग
दादा संग अंगणी
तुझ्या खेळीन
शिकून सवरून
मोठी होईन
बा काळजाचा मी
तुकडा बनेन
तुझी राजकुमारी
घरा येईन
समजू नको तुझ्या
डोईचा भार
शिक्षणाची सीमा मी
करेन पार
गर्वान उंचावेल
तुमची मान
आई बा म्हणण्याचं
भाग्य लाभेन
तुमच्या घराचा मी
दिवा होईन
वात बनून सदा
प्रकाश देईन
