STORYMIRROR

Nandini Narsing Sonare

Others

3  

Nandini Narsing Sonare

Others

बाबा

बाबा

1 min
198

बा किती कष्ट करीतो

चांदण्यात जागितो

शिक्षणासाठी माझ्या

किती चटके सोसतो


थकल शरीर तरी

राब राब राबतो

नाही डोळ्याला डोळा

किती घाम तू गाळतो


एका सुट्टी दिवशीही

तुले कामच काम

कधीच नाही बाबा

तुझ्या जिवाले आराम


माझ्यासाठीच बाबा

आता किती तू झिजतो

लेकराच्या आयुष्यासाठी

कितीदा लढतो 


साहित्याला गुण द्या
लॉग इन