रूप तुझ न्यार
रूप तुझ न्यार
1 min
219
रूप तुझ न्यार | नंदीवर स्वार
तू परमेश्वर | शिवशंभो !!१!!
देवांचा तू देव | भूजगभूषण
देवा तु महान | मृत्युंजय !!२!!
स्मशानात राहे | हे भक्तवत्सल
आवडते बेल | सदाशिव !!३!!
करी पूजा पाठ | तुझ्या श्रावणात
शोभे मंदिरात | शिवलिंग !!४!!