आई
आई
आई ग आई
मला तुझ्याजवळ घे
ओलांडलेले माप तू
पदरात आता घे
तूच आहेस सर्व
काही जाणणारी
दुखाच्या क्षणी ही
फुंकर तू घालणारी
आनंदात असताना
आठवत राहतात क्षण
तुझ्या कष्टांचा घाम
आठवत राहते हे मन
नष्टचर्यचे जीवनआलं
तरी जाणार नाही मान
मित्य गोष्टीच्या त्या मूर्तवतीने
बसेल मज आण
दयानिधी अशी तू
किती गाऊ गोडवे
तुझे गोडवे गाताना
मन मज रडवे
तुझ्या पोटाचे नऊ महिने नाही जाणार व्यर्थ
जगाच्या या जंगलामध्ये करून दाखवीन नाव सार्थ
