हॅप्पी वुमन्स डे
हॅप्पी वुमन्स डे
अष्टपैलू रूपांची
तळपणारी तलवार आहे
शांतीचा कर्तव्य रूपी पण
धगधगती ज्योत आहे
*आदिशक्ती नारी रुपी
या जगामध्ये सर्वांचा समीप आहे*
नवनिर्मितीचा हक्क तिलाच फक्त
ती ममत्व तेचचे उदाहरण आहे
श्वासान मधल्या प्रत्येक क्षणांमध्ये ही
लेकरासाठी तिचे मन कणकण तुटत आहे
*आदिशक्ती मातृत्व रुपी
या जगामध्ये सर्वांच्याच समीप आहे*
संस्कारांची साधना करून
कष्ट कर्तृत्वाचे ती बीज पेरते आहे
आशावादी स्वप्नांमध्ये
ती उंच उंच ध्येय गाठते आहे
*आदिशक्ती स्त्री रूपी
या जगामध्ये सर्वांचा समीप आहे*