थांबले
थांबले
थांबले नशिब माझे
संपली आशा
शोधि वाट कंठी दाठे
जाहली ही दशा
थांबले.......
प्राण जोडला होता मी
ध्यास वाढला होता
तुझ्या प्रीतिच्या वाऱ्यात
झोका सोडला होता
गेलीस तू... दूर
ही वाट स्वर्गाची धरली
तोडूनी स्वप्न बंगला
विरहात तू गं उरली
थांबले....
मिथ्य झाले स्वप्न सारे
संपे सर्व आशा
ईश ना बोले नेत्र ओले
झूरनि लगे आता
थांबले नशीब माझे
संपली आशा
