सौंदर्य
सौंदर्य
स्त्रीला लाभले
देखणे सौंदर्य
गुण तिचे
सहनशीलता,धैर्य
शिक्षकाला दिसते
सौंदर्य अक्षरात
मुलांना घडविण्याचा
मानस मनात
चित्रकाराची सुंदरता
उतरते रंगात
छटा भरती
हर्ष मनात
कवीच्या कल्पनेत
सौंदर्य कवितेला
भाव करती
घायाळ रसिकाला
सौंदर्याने परिपूर्ण
नवनवीन कलाकुसर
हटता हटत
नाही नजर
घराचे सौंदर्य
स्वच्छतेत असे
टापटीप पाहुनी
लक्ष्मी वसे
वाद्यांवर बोटे
चालता छान
सप्तसुरांच्या सौंदर्याची
मिळे खाण
पर्यटक लुटती
आनंद निसर्गाचा
हेवा वाटे
त्याच्या सौंदर्याचा
