STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Romance Fantasy

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Romance Fantasy

आयुष्यावर बोलू काही

आयुष्यावर बोलू काही

1 min
267

जीवन जगायचे हसत हसत

मनात ठेवायचे ना काही

मुक्त उधळून द्यावे पाखरासवे

आयुष्यावर बोलू काही....!!


सदाचार हा मनी ठेवावा

आचरण असावे नेहमी शुद्ध

स्वत:मध्ये हरवून जावे कधी

कधी शोधावा तो बुद्ध....!!


निसर्गाच्या सान्निध्यात

विसरून स्वत:ला जावे

ना धर्म,जात, पंथ,भेद

माणुसकीला सदा जपावे....!!


चार दिवसाचा खेळ सारा

मस्त मजेत घालवावे

मित्र,दोस्त,यार सारे

सा-यासही हसवावे....!!


आठवणींचा आनंद लुटा

करावी थोडी धम्माल मस्ती

जिवनाचा आनंद लुटावा

नको कशाची धास्ती.....!!


इंद्रधनुच्या रंगांमध्ये

बसावे कधी स्वत:स हरखून

आयुष्याच्या आनंदझुल्यावर

घ्यावे सर्वात:स पारखून....!!


मोजमजेने रहावे सदा

जोपासावे आपुले छंद

पोर्णिमेच्या चंद्रासमवेत

यथेच्छ न्हावे प्रकाशात मंद...!!


विसावा आणि विरह नको

कधीच आपल्या व्यक्तीचा

आपुल्याच मनात जपतो रे

विरह आपुल्या भक्तीचा....!!


चार दिवसांचे आपण प्रवासी

जगून घ्यावे खुशाल

अंधकारमय जीवनात कधी

पेटव आता तु मशाल...!!


कामं ऐसे करून जावे

इतरांना वाटेल नेहमी आदर

माणसातला माणूस होवून जग

अंथर तुझ्या प्रेमाची चादर....!!


लोकं तुझा आदर्श घेतील

इतकं तू एक कामं कर

इतरांचे दुःख घे वाटून

मदतीचा फक्त हात धर....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance