खळी
खळी
तुझ्या ह्या खळीने
खुळं मला केलया ।
गोड हसुनं तुझ्या
मन वेडपिसं झालया ।।1।।
नजर ना हटे माझी
तंद्री कवाची लागली ।
डोळ्यांच्या आडात तुझ्या
पुरती नजर भिजली ।।2।।
ऐकायचा करी प्रयत्न
पण शब्द कानी विरले
प्रेम संगीत वाटे मला
ऐकता भान मग हरले ।।3।।
रुसवा तुझा सोड सख्या
विनवणी करते चांदणी ।
चंद्राच्या या प्रेमाशिवाय
ही अधुरी त्याची साजणी ।।4।।
©®गौतमी सिद्धार्थ (1/3/2021)