समजुन घ्यावं स्वतःलाही..
समजुन घ्यावं स्वतःलाही..
थोडं समजुन घ्यावं स्वतःलाही...
नाही होत इच्छा कधी बोलण्याची कोणाशी...
नाही वाटत कधी विनाकारण हसावं....
नाही वाटत कधी काही करावं....
नाही वाटत कुठेही बाहेर जावं....
नाही वाटत कधी स्वतःचं रडु थांबबावंं...
नाही कळत का असं होतय आपल्याशी...
विनाकारण झगडण्यापेक्षा
स्वतःला वेळ द्यावा....
एकटेपणा ही भावना नको
पण एकांतात स्वतःलाच विचारावे
नेमके काय हवे आहे मला...
आपणही माणुसच आहोत हे समजुन घ्यावे...
आवश्यकता असल्यास मदतही घ्यावी समुपदेशकांची,
पण हार मानुन डाव मोडु नये...
किंवा स्वतःला संपवण्याचा अविचारही करु नये....
पुन्हा सर्व मळभ दुर सारुन
उभे ठाकावे लढण्यास...फिनिक्स पक्षाप्रमाणे.....
©®गौतमी सिद्धार्थ (26/2/2021)
