सागरी किनारा
सागरी किनारा
कविता प्रकार -षडाक्षरी
सागरी किनारा
वाळुमय पाय ।
चमकती जसे ।
हिरे जणु काय।।1।।
सागरी किनारा
सुर्यास्त सोबती ।
आठवता तुला
फिरे माझी मती ।।2।।
सागरी किनारा
स्पर्शती ह्या लाटा ।
तुझी नवी स्वप्न
नि वेगळ्या वाटा ।।3।।
सागरी किनारा
चित्रं काढी तुझी ।
निःशब्द मी होई
दिसे छबी माझी ।।4 ।।
गोंधळुन गेले
खेळ सुरु झाला ।
मनातल्या मनी
घोळ सुरु झाला ।।5।।
विसरता तुला
आठवणी छळे ।
डोळे माझे झाले
हे अश्रुचे तळे ।।6।।
पाठव ते श्र्वास
पाठव तो स्पर्श ।
पाठव ती स्वप्न
पाठव तो हर्ष ।।7।।
पुन्हा जीवनात
आला सखी बाई ।
सागरी किनारा
त्यालाच की घाई ।।8।।
©®गौतमी सिद्धार्थ (1/3/2021)