बोक्या
बोक्या
आमच्या बोक्याची
तर्हाच हो न्यारी
किती जीव लावा
नखे मुद्दाम मारी ।।1।।
याच्या जवळ बसुन
फिरवा डोक्यावरुन हात
याला वाटे खेळ सुरु
मारी छानशी लाथ ।।2।।
आपल्याच जीवाला घोर
याचं सगळं निवांत
मला आवड गर्दीची
याला प्रिय एकांत।। 3।।
बोक्या ही हाक मारा
तर हु नाही की चु
म्याॅव करुन गुरके मग
म्हणे दुर्लक्ष करे तु।।4।।
जरा काही खुट्ट झालं
नाकाच्या शेंड्यावर राग
आपल्यालाच सांगी
की जरा प्रेमाने वाग ।।5।।
दुसर्याचे केलेले लाड
याला नाही चालत
बसुन राही नजरेसमोर
मग नाही हलत ।।6।।
याच्या बाॅसगिरीचा
कंटाळा येई कधी
जीव गुंतला त्याच्यात
गोष्ट हीच साधी ।।7।।
कितीदा तरी मज वाटै
द्यावे याला कायमचे सोडुन
पण काय मिळणार मला
याला माझ्यापासुन तोडुन।।8।।
नजरेसमोर दिसला तरी
मनाला हो वाटतं छान
त्याचं तो मस्त जगतो
आणि गोड आहे ध्यान ।।9।।
©®गौतमी सिद्धार्थ (1/3/2021)