मैत्री म्हणजे....
मैत्री म्हणजे....
"वडाचे झाड" वर्षानुवर्ष टिकणारी,आपल्या नात्याला बळ देणारी,खोलवर मुळे रुजुन राहणारी...
" गुलाबाचे फुल" सुगंध सतत पसरवणारी,प्रसन्न करणारी
पण त्याच्या काट्यांप्रमाणे चुकलेल्या गोष्टी टोचुन सांगणारी...
"जाईजुईचा वेल" नाजुकसार,सुगंधी,वेलीप्रमाणेच आपल्यालाही वर वर प्रगतीपथावर नेणारी....
"लाजाळुचं झाड" इतरांनी हात लावल्यावर मिटुन घेणारी तशीच आपली गुपिते इतरांपासुन लपवणारी.....
"पर्वत" स्थितप्रज्ञासारखी ,येणार्या संकटासमोर ठामपणे उभे राहणारी आपल्याही नकळत....
"सुर्यासारखी" नेहमी सोबत असणारी,कोवळ्या व कडक उन्हासारखी दोन्हीही हवीहवीशी....
"नदीसारखी" खळाळणारी,मनमुराद हसणारी हसवणारी......
"धबधब्यासारखी" देहभान विसरुन कोसळणारी, त्या पांढर्या शुभ्र फेसाळत्या पाण्यासारखी स्वच्छ,निर्मळ.....
"पाऊसासारखी" त्याच्या बरसण्याच्या सरीत आपण मंत्रमुग्ध होऊन जातो व कधी त्यासरी चेहर्यावर घेताना स्वतः रडतोय हे इतरांना नाही पण त्याला जरुर कळते.....
"वार्यासारखी" हलकी झुळुक, आल्हाददायक तर कधी सोसाट्याचा वारा.....
"सोनचाफ्याचे फुल" सुकुन गेले तरी तळहातावर त्याचा सुगंध दरवळत राहतो.
सतत भेटी नाही पण ते आठवणींचे क्षण आपण नेहमी जगतो........
"अथांग सागर" आपल्या चुका कवेत घेणारा, त्याच्या लाटांवर आपल्यालाही डोलायला लावणारा.....
मैत्रीत कधी "तो" किंवा "ती" नसते मैत्री, मैत्री असते.......
