आठवण
आठवण
आठवणीतल्या कुपीतलं
काही, संपत नाही अत्तर।
या सुगंधाला लपवु कसे
मिळे ना याचे उत्तर ।। 1 ।।
दिवसागणिक साठ्यात
भर चालली पडत
कडु गोड आठवणींनी
डोळे मात्र रडत ।। 2।।
आयुष्य करावे आता
या अत्तराने सुगंधीयुक्त
चिंता ,काळजी दुर लोटुन
व्हावे सहज निराशामुक्त ।।3 ।।
मला आता आठवणसुगंध
वेड रे लागला लावू
आनंदाचा हा हिंदोळा
कसा तुला मी दावू ? ।।4 ।।
