STORYMIRROR

गौतमी सिद्धार्थ

Comedy Others

3  

गौतमी सिद्धार्थ

Comedy Others

गुलाबी थंडी

गुलाबी थंडी

1 min
548

टोपण नाव - गौतमी सिद्धार्थ 

गुलाबी थंडी, धुक्याची झालर

तुझ्या भेटीस निघाले घेऊन मफलर..

तुझ्या भेटीची आस ही खुप

खुलवलं त्यासाठी मी माझे रुप..

शाल स्वेटर कानटोपी, त्यात मास्क भरीस भर ..

केला छान साजशृंगार, गेला लपुन मेकपचा थर..

छुपा मनसुबा भेटीत होता, शतपावलीचा बेत केला होता..

तेवढेच झाले असते, शे दोनशे ग्रॅम वजन कमी..

मलाही व्यायामाची आवड आहे, याची दिली असती हमी..

घराबाहेर पाऊल टाकता आली थंडीची लाट

इच्छा असुनही दिसेना तुझ्या भेटीची वाट

जाऊ दे मित्रा, जड अंतःकरणाने पुन्हादुलईत शिरले

पुढच्या हिवाळ्यात नक्की भेटेल हे यावेळीही ठरले

रागाऊ नकोस रे मित्रा, रवी, सविता

या सूर्याला किती नावाने हाक मारु आता..

रुसुन बसला ढगात म्हणे नेहमीच तुझी सरशी

दुलईत द्या मस्त ताणून, व्यायाम आता पुढल्या वर्षी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy