मी बेभान नाचले रे
मी बेभान नाचले रे
तुझी माझी प्रीत निराळी
जगावेगळी ठरली रे
प्रेमाच्या या सुखसागरात
मी पुरती हरली रे ।। 1 ।।
आठवणीत तुझ्या सारे
दिवस माझे सरले रे
हळव्या भावना मनात
फक्त आता उरल्या रे ।। 2 ।।
पापण्यांच्या कडाआड
अश्रु ही लपले रे
स्मितहास्य न जाणो
का आज रुसले रे।। 3 ।।
पाहता तुझी वाट
डोळे ही थकले रे
आठवणीत तुझ्या
कविता ही सुचली रे ।। 4 ।।
तु असा दूरदेशी
कामात पुर्ता गर्क रे
विसरला तर नाही मला
असा माझा तर्क रे ।।5 ।।
येता तुझे पत्र
शंकानिरसन होई रे
राग ही माझा
क्षणात पळुन जाई रे ।।6 ।।
अनामिक ओढ ही
जीवंत ठेवी नाते रे
आठवुन तुला रोज
प्रीतगीत गाते रे ।।7।।
कैक वर्ष तु नजरेआड
भरुन डोळा पहायचे रे
होईल ना रे पुन्हा भेट
की भेटायचे राहुन जाईल रे ।। 8।।
आला तो सुदिन
मनसोक्त आज सजले रे
तुला पाहता समोर
मी बेभान नाचले रे ।।9।।

