घडी चालली वयाची
घडी चालली वयाची
घडी चालली वयाची
जुनी रीत विसरुनी
नवं करती संसार
आड सारूनी झटतें !!
तोल तोलते तराजू
जिणं मोजतं घटिका
बसं बसवत आली
सदा शांतता शिकवं !!
शोध लागते अंतरीं
गंगा रहस्यी अथांग
प्रकाश वेळेचे सूर्य
बसलें ठिकठिकाणी !!
अवतीच फिरे काव
घर घरात घडीत
सुटेना साव स्वतःच
नाही धरिला देवता !!
येतील जातील रूप
सर्व वेळाहुनी भिन्न
आजन्म संघर्ष इथं
क्रांतीविना जीवन शून्य .... !!
