STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

प्रत्येक...

प्रत्येक...

1 min
254

प्रत्येक आयुष्य एक पुस्तक असतं 

 कधी मन मोकळं कधी रहस्यात बुडालेलं...


 प्रत्येक मन एक काव्य असतं 

कधी लिहिलेलं, कधी बंदीस्त केलेलं... 


प्रत्येक भावनेला एक गाव असतं 

कधी एकसंध कधी दुभंगलेलं...


 प्रत्येक वेदनेला एक घर असतं

 कधी आपलं कधी परक्यातलं...


प्रत्येक जीवनाचं एक पाऊल असतं

 कधी यशातलं कधी अपयशातलं..  


प्रत्येक अश्रू एकदातरी ओघळत असतो 

कधी डोळ्यातून कधी अंतरातून...


प्रत्येक क्षण हा कधीतरी महत्वाचा वाटतो

कधीतरी सुखाचा, कधी दुःखाचा

 कधी विरहात रूसलेला, कधी प्रतीक्षेत बसलेला

 तर कधी आठवणीने फुललेला...

क्षण हा असतो मात्र हृदयात खोलवर ठसलेला ...🙏😊


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract