मैत्री म्हणजे काय
मैत्री म्हणजे काय
मैत्री म्हणजे एकमेकांचा अतुट विश्वास
मैत्री म्हणजे कायमस्वरूपी सहवास
मैत्री म्हणजे चंदनाचा दरवळलेला सुगंध
मैत्री म्हणजे न तुटणारे आयुष्याचे बंध
मैत्री म्हणजे पहाटेच्या दवबिंदूचा गारवा
मैत्री म्हणजे मायेच्या ओलाव्याचा विसावा
मैत्री म्हणजे निखळत स्वच्छ पाणी
मैत्री म्हणजे चमचमणारी चांदणी
मैत्री म्हणजे संकटकाळी विश्वासाचा आधार
मैत्री म्हणजे खचलेल्या मनाला देई उभार
