बापाची माया
बापाची माया
सर्व गुणगुणती आईची माया
बाप म्हणजे घराचा पाया
बाप म्हणजे काटेरी फणस खरे
आतून पाहिला तर दिसे प्रेमाचे गरे
मुलांसाठी राबे बाप दिवस-रात
तहान भूक विसरूनी जागे रात- रात
ढाल बनुणी सोबत पाठीशी
कुणी वैरत्व व पत्करे माझ्याशी
बापाची माया असे सुगंध चंदनाचा
झिजला कितीही तरी सुगंध येई मायेचा
जेव्हा बापाची पूर्ण होईल साठी
बनु आम्ही त्यांच्या आधाराची काठी
