नशीब
नशीब
हे मानवा, जन्म घेतलास रे पृथ्वीतळी
कर्माचे वैधानिक बंधन, तुझिया गळी
कर्म बंधनास विसरू नको मुळात तू
उडया मारण्या कर धडपड आळस त्याग तू
तुझ्या नशिबी कितीबी असूदेत धनदौलत
स्वतःच्या कर्मकृती सफारीने मिळव शानशौरत
नशिबाचे अफाट देणं त्यावरी नको रे विसंबून
वर्तमानी काय कर्म? यावर नशीब अवलंबून
कुकर्म त्याग करुनी, झेप घे सत्कर्माची
माणुसकी खरा मूळ धर्म, धर कास सत्याची
