STORYMIRROR

Umesh Dhaske

Abstract

3  

Umesh Dhaske

Abstract

पेरणी..!

पेरणी..!

1 min
349

गरज आहे आता माणूस पेरण्याची....

वाट बघायचीच नाही माणूस 

उगवण्याची.....!


खात्री नाही आम्हाला

शाश्वती तर मुळीच नाही...

पेरलेल्या मातीशी माणसानं

इमान कधी राखलचं नाही......!


माणूस उगवला तर माणूसकीचं

वृक्ष बहरुन येईल 

ह्या हव्यासी समाजात...

माणूसकीची भिंत मग उभारावी 

लागणार नाही आमच्याच मार्गात.....!


पेरलेल्या समाजात गाडून 

घेतलेल्या माणसानं उगवायचं

कधी ठरवलच नाही...

समाजातल्या किड्यामुंग्यांनी

त्याला कधी

वर येऊ दिलच नाही......!


माणसाच्या जातीच बीयाणं 

मागितलं तर त्यात पण भेसळ आहे जातीयवादयांची.....

म्हणूनच माणसानं पाडलेल्या 

जातीची धिंड निघतेय 

चर्चा नुसतीचं खुर्चीवाल्यांची......!


माणूस पेरल्याशिवाय 

अब्रू वाचणार नाही लेकीसुनांची

माणूस उगवल्याशिवाय

मुसंडी आवळली जाणार नाहीत

भ्रष्टाचारांची

माणुसकीनं जन्म घेतल्याशिवाय

किंमत कळणार नाही लोकशाहीची.......!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract