STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Others

पत्र

पत्र

1 min
269

 पत्र माझे हरवले 

कोण सांगेल पत्ता का? 

भाव लिहिले मनातले 

कोण वाचेल का? 


बदलत्या काळाच्या ओघात 

सर्व काही बदललं कसं

शोधूनी पण सापडेना 

हरवलेल पत्र जसं 


पत्रातून उमटलेल्या भावना 

कोणी समजून घेईल का? 

अश्रु गोठले तिथेच 

निःशब्दाचे कारण सांगतील का? 


पत्रांची जागा घेतली 

आधुनिक तंत्रज्ञानाने 

तंत्रज्ञान झाले विकसित 

समजले नाही भाव शब्दांचे 


शब्द मिटत गेले 

आठवण तशीच राहिली 

जुने झाले पत्र 

वाट कुणी न पाहिली 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract