STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

आकाश डोळ्यांत भरताना...

आकाश डोळ्यांत भरताना...

1 min
166

आकाश डोळ्यांत भरून ,

सावरून घेऊ डोळ्यांतुन झरताना,

उंच जाऊ दे हिंदोळा मनाचा,

प्रेमात एकमेकांच्या भिजताना ...


कोवळ्या कोवळ्या उन्हामध्ये ,

तेव्हा सुर गाऊया प्रितीचे,

शहारून येईल ओली माती,

प्रेमात रंग भरताना...


सुख साजिरे गोड हासरे,

आनंद मनाचा स्त्रवताना ,

नको दूरावा असह्य मनाला,

दूनियेशी लपंडाव खेळताना ...


रिमझीम ओल्या सरी,

भिजवुनी मला नेती कुठेतरी,

स्वप्न सुंदर डोळ्यांत घेऊनी,

पापण्या चंद्राला लाजताना ...


कुठे गेला तो दूर किनारा ,

सागरा जवळ करताना,

आजची सांज इथेच थांबली,

हिरमुसले पक्षी घरट्याकडे वळताना...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract