STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

वळणापल्याडची सखी

वळणापल्याडची सखी

1 min
134

वळणदार वाटेवरती

निरोप देती बंधुभगिनी

आठवांचे क लश देऊनी

सदगदित् साश्रू नयनी


बावरले मी भय दाटले

मन माझे कावरेबावरे

हात हातीचे सुटत होते

कसे जग वळणापल्याडे


सखी कविता स्मितवदने

स्वागतास ये भगिनींसवे

 बहर साहित्यास नेमाने

नव्या जगी मैत्र सख्यांसवे


रोज नवीन उपक्रमांनी

बहरले मन मोहरले

 रमले अन् लिहिती झाले

या सखीने मला घडविले



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract