घुसलेले काटे
घुसलेले काटे
पंखातले बळ ज्यास दिले
पंखच पार छाटून टाकले
दुडूदूडू चाल वेगळी झाली
भिंगरी घेत भरकन वळली
छोटे छोटे रूप मनोहर
आता घालते फार कहर
छोट्या पापण्या मोठे आकाश
उरला नाही थोडाही अवकाश
मनास हरवलेली लांब गेली
नकळत घटनांच्या आहारी गेली
वाटेची पार वाट लागली
घुसलेल्या काट्यांना कवटाळत बसली
