STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

चूक नसतांना

चूक नसतांना

1 min
131

चूक नसतांना ही 

 माघार घ्यावी कधी कधी  

विस्कटलेल्या मनाची घडी 

जपून धरावी कधी कधी  


चुक कुणाची पाहण्यापेक्षा

 कुठे चुकते ते पहावे कधीतरी

 खरे कोण, खोटे कोण

 सोडून द्यावे कधी कधी  


लहानपण घेऊनी

 अंगी मोठेपण मिरवावे 

जपण्या नाती आपुलकीची

 क्षमा मागावी कधी कधी  


रूसवा- फुगवा क्षणात

 विसरूनी ॠणानुबंध 

अलगदपणे जपावे कधी कधी 

अंहमपणाला दूर सारुनी

" मी" पण विसरावे कधी कधी

स्वतःसाठी सगळेच जगतात

आपल्या माणसांसाठी 

 जगून बघावे कधी कधी 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract