STORYMIRROR

Monali Kirane

Abstract

3  

Monali Kirane

Abstract

कावळा

कावळा

1 min
130

आत्ता करतोस कावकाव,पिंडाला माझ्या शिऊन जा

ताटकळणा-या लोकांना सुटकेचा श्वास देऊन जा.

अडकेल माझा जीव,पिलुला मिळतंय का सात्विक खाणं?

जमतंय का त्याला सा-या संकटांना तोंड देणं?

खवय्या माझा नवरा,कोण ऐकणार फर्माइशी

की नशिबी त्याच्या येणार चतुर्थी नी एकादशी!

बेभरवशाची तुझी कावकाव,देईन त्याला फाटा

निवृत्त करीन मनाला,तुझा उरणार नाही वाटा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract