डिप्रेशन
डिप्रेशन
रोजचंच झालंय आता,सकाळची वाट पाहाणं
सरणा-या वेळे सोबत टिकटिकत रहाणं.
कुरतडणा-या काळज्यांचं मनावर घेत पांघरूण,
न संपणा-या स्वप्नांचं सतत ओझं वाहाणं
जडावलेल्या डोळ्यांमधे,थकलेल्या दृष्टीने,
उत्साहाशी फारकत घेत,कधी तरीच नहाणं!
आत-बाहेर युद्ध खेळत,रोज पुन्हा नव्याने
धराशाही मनाचं आक्रंदित गुज गाणं!